संकटाच्या काळात केजच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा तुटवडा


तज्ञ डॉक्टरांचा अभाव, ऑर्थो, बालरुग्ण तज्ञांच्या हाती कारभार
केज (रिपोर्टर):- केजच्या उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा आहेत. तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. विमलताई मुंदडा यांच्या कार्यकाळात दवाखान्याचे काम झालेले आहे. या परिसरात नावाजलेला केजचाच असून सद्यपरिस्थितीत या रुग्णालयाला अवकळा आली. तज्ञ डॉक्टरांचात तुटवडा आला असून ऑर्थो आणि बालरुग्ण तज्ञांच्या हाती रुग्णालयाचा कारभार सोपविलेला आहे. कोविडची महामारी पाहता तज्ञ डॉक्टरांची भरती करण्याची मागणी केली जात आहे.


रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी
जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल


लाखो रुपये खर्च करून केज येथे स्व. विमताई मुंदडा यांनी उपजिल्हा रुग्णालय उभारले. त्यांच्या कार्यकाळात हे रुग्णालय अत्यंत व्यवस्थीत होते मात्र मध्यंतरी या रुग्णालयाला अवकाळा आली. रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग असताना डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णांवर योग्य उपचार होत असल्याचे दिसून येते. काही डॉक्टरांची इतर ठिकाणी नेमणूक करण्यात आली. यामध्ये केंद्रे मॅडम यांचे प्रमोशन झाले, डॉ.चव्हाण प्रमोशनवर अंंबाजोगाईला गेले. डॉ. रेगे डेपोटेशनवर बीडला आहेत. गिते मॅडम यांची परळी येथे नेमणूक करण्यात आली. डॉ. पवार हे आजारी असल्यामुळे ते सुट्टीवर आहेत. डॉ. असवले हेही सध्या रुग्णालयात नसतात. डॉ. चाळक आणि डॉ. इंगोेले हे दोघे काम करत असले तरी तज्ञ डॉक्टर रुग्णालयात नसल्यामुळे रुग्णालयाला अवकळा आली. अधीक्षक डॉ. संजय राऊत हे चांगल्या पद्धतीचे काम करत आहेत मात्र आरोग्य प्रशसानाकडून डॉक्टरांच्या जागा भरल्या जात नसल्याने रुग्णालयामध्ये दररोज येणार्‍या रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. याबाबत तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रुग्णालयात डॉक्टरांची भरती करण्याची मागणी शासनाकडे करावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.