Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडकार्य कर्तृत्वावरच सतीश चव्हाण हॅटट्रीक साधणार-अशोक डक

कार्य कर्तृत्वावरच सतीश चव्हाण हॅटट्रीक साधणार-अशोक डक


माजलगाव (रिपोर्टर)- पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे विकासाभिमुख दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. अशा विकसनशील नेत्याला मतदान करा. सतिश चव्हाण हे कार्य कर्तृत्वावरच निश्चित हॅटट्रीक साधतील असा विश्वास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी व्यक्त केला आहे.
अशोक डक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सामान्य माणसांची काळजी घेणारे महाविकास आघाडीचे सरकार असून सर्व घटकांचा विकास हवा असेल तर सतीश चव्हाण हे अतिशय योग्य उमेदवार आहेत. सतीश चव्हाण यांच्या रूपाने मराठवाडा पदवीधर मतदारसंघांला सक्षम उमेदवार मिळालेला आहे. पदवीधर युवकांनी विकास समोर ठेवून सतीश चव्हाण यांना मतदान करावे असेही आवाहन सभापती डक यांनी केले आहे. दरम्यान, सतीश चव्हाण हे कार्य कर्तृत्वावरच निश्चित हॅटट्रीक साधणार आहेत असा ठाम विश्वास अशोक डक यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!