Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमसामाजिक हितासाठी जमीयतला जागा मिळून देण्याच्या प्रयत्नात माजी उपनगराध्यक्ष फारूख पटेल यांना...

सामाजिक हितासाठी जमीयतला जागा मिळून देण्याच्या प्रयत्नात माजी उपनगराध्यक्ष फारूख पटेल यांना शिक्षा

बीड(रिपोर्टर): जमियत उलेमा ए हिंद या सामाजिक संघटनेला बीड नगर पालिकेने नियमानुसार डेव्हलप केलेली जागा दिली होती. त्याचे दोन पीटीआर देखील जमीयतच्या नावाने बनवून देण्यात आले होते मात्र त्या जागेवर वन विभागाने दावा केला, यातून 2015 साली वाद निर्माण झाल्याने या वादातून माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल व जमियतचे हाफीज जाकेर सिद्दीकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा निकाल काल लागला असून यामध्ये दोघांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आतापर्यंत फारुक पटेल यांच्यावर झालेल्या केसेस या समाजाच्या हितावरूनच झालेल्या आहेत.
बीड नगर पालिकेने जमियत उलेमा ए हिंदला अधिकृत ठराव घेवून 2015 मध्ये फारुक पटेल यांच्या घरासमोरील जागा समाजकार्यासाठी देण्यात आली होती. याबाबतच्या पीटीआरवर जमीयतचे हाफेज जाकेर सिद्दीकी यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती. वनविभागाने सदरील जागेवर आक्षेप घेत त्या जागेवर दावा केला होता. त्यावेळी त्या ठिकाणी वाद निर्माण झाला होता. फारुक पटेल समाजहिताच्या दृष्टीने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते मात्र वन विभागाने हाफेज जाकेर सिद्दीकी यांच्यासह पटेल यांच्या विरोधात 353, 362, 427, 504, 506, 143 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. काल त्या प्रकरणात न्यायालयाने दोघांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. न्याय पालीकेने पीटीआर नोंद घेवून आणि सर्व आवश्यक कारवाई करूनही ही जागा जमियतला दिली होती. त्यामुळे वनविभागाने त्यांच्याशी भांडायला हवे होते, मात्र त्यांनी ज्यांच्या नावे पीटीआर केला आणि ज्यांनी मध्यस्थी केली त्यांच्यावरच गुन्हे नोंदवले. सामाजिक कामासाठी कोणी पुढाकार घेत असेल आणि त्यासाठी पाठपुरावा करून मध्यस्थी करत असेल आणि त्यांच्यावरच गुन्हे दाखल होत असतील तर भविष्यात सामाजिक कामासाठी कोणी पुढे येणार नाही अशी चर्चा होत आहे. सदरील प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांनी काम पाहिले होते.

Most Popular

error: Content is protected !!