Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमकिरण तंत्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या

किरण तंत्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या

परळी वैजनाथ — परळी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सिद्धार्थ पंडितराव जाधव असे मयत कर्मचाऱ्याचे नाव कळले आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळलेले नाही. मयत सिध्दार्थ पंडितराव जाधव हे परळी उपजिल्हा रुग्णालय येथे क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणुन सुमारे दोन महिण्यापुर्वी रुजु झाले होते. मंगळवारी सकाळी जेव्हा सिध्दार्थ जाधव नौकरीवर आले म्हणुन मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल उचलत नसल्यामुळे राहत असलेल्या शासकीय निवासस्थानाकडे विचरणा केली असता दरवाजा आतुन बंद असल्यामुळे दवाखाना प्रशासनाने पोलिसांकडे संपर्क करुन पोलिसांना बोलावून घेतले. घर उघडून पाहिले असता जाधव हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. सिध्दार्थ जाधव यांनी का आत्महत्या केली हे कळु शकले नसले तरी पोलिस तपासात हे नक्कीच उघडकीस येईल. अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!