Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमकडा पोलिस चौकापासून हाकेच्या अंतरावरील दोन दुकाने फोडली

कडा पोलिस चौकापासून हाकेच्या अंतरावरील दोन दुकाने फोडली

पोलिस गस्त घालतात की झोपा काढतात
 घाटपिंपरी( रिपोर्टर)- कडा येथील नगर बीड रस्त्यावरील दोन दुकाने अज्ञात चोरट्याने रविवारी मध्यरात्री दुकानाचे सेटवर चे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली. येथील चौकीपासुन हाकेच अंतरावरील दुकाने अज्ञात चोरटयांनी फोडल्याने येथील पोलिस गस्त घालतात की झोपा काढतात असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
   नगर कडा बीड राष्ट्रीय महामार्गा लगत गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स व महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स दोन्ही दुकाने शेजारी शेजारी आहेत  गुरुकृपा इंजिनिअरिंग चे मालक विजय वाघ व न्यू महाराष्ट्र चे मालक प्रवीण हे  निंबाळकर हे दोघेही रविवारी आपली दुकाने बंद करून त्यांच्या मूळ गावी दादेगाव येथे आले परंतु त्याचा फायदा घेत चोरट्यांनी रविवारी च्या मध्यरात्री कुलूप तोडून दुकानातील रिपेरिंग साठी आलेल्या मोटारी व स्पेअर पार्ट याची धाडसी चोरी केली यात दोन्ही दुकानदारांचा लाख ते दीड लाखाचा मालावर चोरट्यांनी डल्ला मारला असुन अद्याप आष्टी पोलिस ठाण्यात कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Most Popular

error: Content is protected !!