Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीवडवणीच्या प्रभाग 3 च्या मतदान केंद्रावर पोलीसांकडून सौम्य लाटीमार, इतरत्र शांतेत मतदान

वडवणीच्या प्रभाग 3 च्या मतदान केंद्रावर पोलीसांकडून सौम्य लाटीमार, इतरत्र शांतेत मतदान

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी नगर पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत असुन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाजार समिती येथील  प्रभाग 3 च्या मतदान केंद्रावर दोन गटात बाचाबाची झाली असून जिल्हा दंगल पथकाकडून सौम्य लाटीमार करण्यात आला असून इतरत्र मतदान शांतेत सुरु आहे.


वडवणी नगरपंचायतीच्या 13 जागेसाठी आज निवडणुक होत असुन तब्बल 33 उमेदवाराचे भवितव्य मतदान पेठीत बंद होत आहेत.आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.यात दुपारी जवळपास साडे बारा वाजेपर्यत 50% पेक्षा अधिक मतदान झाले आहे.तर सकाळी साडेदहा वाजता प्रभाग 3 मधील बाजार समितीच्या मतदान केंद्रावर भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये मतदारावरुन बाचाबाची झाली यांच्या रुपांतर झकडपकड मध्ये झाले.गर्दी जमत असल्याच पाहवयास निदर्शनास आल्या बरोबर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या दंगल नियंत्रण पथकातील जवानानी धाव घेत सौम्य लाटीमार केला यानंतर काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाली होता.तर इतर 12 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांतेत पार पडत आहे.दुपारी साडेबारा वाजेपर्यत 50%पेक्षा आधिक मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून प्रभाग 3 आणि 8 याठिकाणी इतरपेक्षा याठिकाणी पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला असल्याच दिसून आले आहे.

आ.प्रकाश सोंळके यांची प्रत्येक केंद्रावर भेट
सदरील निवडणुक हि आ.प्रकाश सोंळके सह सभापती पुतणे जयसिंह सोंळके यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.आज सकाळीच अकरा वाजण्याच्या सुमारास आ.प्रकाश सोंळके यांच्यासाह माजी आ.केशवराव आंधळे,बहुजन विकास मोर्चार्चे संस्थापकिय अध्यक्ष बाबुराव पोटभरे,मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक,जि.प.सभापती जयसिंह सोंळके यांच्यासह आदि नेतेगण दाखल झाले असुन निवडणुक होत असलेल्या उमेदवारांच्या बुथ वरील पाँडोल टाकण्यात आलेल्या ठिकाणी भेट घेऊन आढावा घेत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!