Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडओबीसी आरक्षणासाठी महामार्गावर रास्ता रोको

ओबीसी आरक्षणासाठी महामार्गावर रास्ता रोको

बीड (रिपोर्टर)– स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज समता परिषदेच्या वतीने बीड बायपास रोडवरील महालक्ष्मी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

raut 2

राज्य सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाजु असताना केंद्र सरकार मात्र ओबीसी समाजावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारकडे इंपेरिकल डाटा असताना तो चुकीचा असल्याचा अहवाल केंद्राने न्यायालयात सादर करून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील ओबीसी समाजाबाबत तिरस्कराची भावना दाखवून दिली आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा या मागणीसाठी आज बीड बायपास रोडवरील महालक्ष्मी चौकात समता परिषदेने रास्ता रोको आंदोलन केले. हे आंदोलन अ‍ॅड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी निखिल शिंदे, प्रकाश राऊत, राम राऊत, राजाभाऊ सत्वधर, शिवप्रसाद खेत्रे, बळवंत सत्वधर, नारायण शिंदे, रावसाहेब राऊत, भगवान काळे, लहु फुटाणे, मसुराम साळुंखे, रणजीत पाटील, नितीन साखरे, मुकुंद साखरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Most Popular

error: Content is protected !!