Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडउद्या ‘पदवीधर’साठी मतदान

उद्या ‘पदवीधर’साठी मतदान

जिल्ह्यात १३१ मतदान केंद्रांवर होणार मतदान; गुप्त गाठीभेटींना वेग
बीड (रिपोर्टर)- मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा प्रचार काल संपला. गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाड्यामध्ये विविध पक्षांचे विविध कार्यकर्ते आपआपल्या उमेदवारांसाठी प्रचाराची मोहीम राबवत होते. आरोपी-प्रत्यारोपानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता गाठीभेटींना वेग येणार आहे. उद्या सकाळी पदवीधरांसाठी मतदान होतअसून मराठवाड्यात ८१३ मतदान केंद्र आहेत. बीड जिल्ह्यामध्ये १३१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. महाआघाडीकडून सतीश चव्हाण तर भाजपाकडून शिरीष बोराळकर हे उमेदवार असून एकूण ३५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महाआघाडीकडून आ.सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित असल्यामुळे सतीश चव्हाण यांचे पारडे पुर्वीपासूनच जड राहिलेले आहे. भाजपामध्ये बंडखोरी झाली. दुसर्‍यांदा भाजपाने बोराळकर यांना उमेदवारी दिली. बीडचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपली उमेदवारी दाखल केली. काल प्रचाराच्या तोफा थंडावल्या. गेल्या पंधरा दिवसांपासून मराठवाड्यामध्ये विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आपआपल्या उमेदवारांसाठी प्रचार करत होते. उद्या १ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. प्रचार संपला तरी अंतर्गत गाठीभेटींना वेग येणार आहे. मराठवाड्यात एकूण ८१३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून बीड जिल्ह्यामध्ये १३१ ठिकाणी मतदान होणार आहे. एकूण ३५ उमेदवार या निवडणुकीमध्ये आपले नशिब अजमावत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!