Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमकेज शहरात शॉर्ट सर्किटने पाच दुकानांना आग; 50 लाखांचे नुकसान

केज शहरात शॉर्ट सर्किटने पाच दुकानांना आग; 50 लाखांचे नुकसान


केज (रिपोर्टर) केज शहरातील हायवे रोडवर असलेल्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये पाच दुकानं भस्मसात झाली. यात पाचही दुकानातील जवळपास 50 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली. आग लागल्याचे समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या जळीत घटनेमुळे शहरातील व्यापार्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


केज येथील हायवे रस्त्यावर असलेल्या भारत इलेक्ट्रीकल्स, उत्तम उपहार गृह, कृष्णा ऑटो गॅरेज, सोनाली ऑफसेट मशीन, गोविंद जेन्टस् पार्लर या पाच दुकानांना रात्री दोन वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये सर्व दुकानातील विविध साहित्य जळून खाक झाले होते. भारत इलेक्ट्रीकमधील 10 लाख रुपयांचे तर कृष्णा ऑटो गॅरेजमधील महेश चौरे यांचे 85 हजार रुपयांचे, सोनाली ऑफसेटमधील 47 हजार रुपयांचे नुकसान झाले तर इतर दुकानातीलही नुकसान झाले असून जवळपास पाचही दुकानातील 50 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी अनेकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझवण्यात यश आले नसल्याने दुकानातील वस्तुंचा कोळसा झाला. या दुर्दैवी घटनेने शहरातील व्यापार्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!