Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशेळी चोरून पळणार्‍यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार एक जखमी

शेळी चोरून पळणार्‍यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक; दोन ठार एक जखमी

नेकनूर (रिपोर्टर) रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत शेता-पोतातल्या शेळ्या चोरून नेणार्‍या टोळीला रात्री जबरदस्त किंमत मोजावी लागली आहे. एका मोटारसायकलवरून शेळी चोरून नेणार्‍या तिघांना पोलिसांची जीप दिसताच त्यांनी राँग साईडने मोटारसायकल वळवल्याने भरधाव वेगात येणार्‍या अज्ञात वाहनाने त्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही चौसाळा बायपासवर वाहनांवर दगडफेक करत असल्याचे सांगण्यात येते.


उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन दरोडेखोर मोटारसायकलवर चौसाळा परिसरामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरत होते. रात्री चौसाळा बायपासवर या चोरट्यांनी काही वाहनांवर दगडफेकही केली. याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर नेकनूर पोलिसांची पेट्रोलिंग गाडी त्या भागातून जात होती. त्याच दरम्यान या चोरट्यांनी परिसरातील एक शेळी चोरली आणि ती दुचाकीवर घेऊन पसार होऊ लागले. त्या दरम्यान समोरून त्यांना पोलिसांची गाडी दिसली असता चोरट्यांनी आपली मोटारसायकल राँग साईडने सुसाट वेगाने नेण्यास सुरुवात केली. त्या वेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला बीड येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास चौसाळा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार बाबासाहेब डोंगरे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!