Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeकोरोनासर्व सभासद जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे -ऍड. लोहिया

सर्व सभासद जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे -ऍड. लोहिया


बीड (रिपोर्टर)- श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँक ही मराठवाड्यातील नामांकित बँक आहे. संचालक मंडळ सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करत आहे. बँकेने प्रगतीचे सर्व शिखरे गाठली आहेत. बँकेच्या ४६ शाखा असून बँकेचा विस्तार संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. बँक सातत्याने पुरस्काराने सन्मानित होत आहे. सतत अ दर्जा राखणारी आणि नफ्यात असणारी बँक आहे. बँकेच्या स्थापनेपूसन आम्ही कार्यरत आहोत. सभासदांचा अढळ विश्वास विद्यमान संचालक मंडळावर आहे. ते जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे सभासद जनाधार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ढाल-तलवार या चिन्हावर मतदान करुन प्रचंड मताने विजयी करतील असा विश्वास ऍड.सत्यनारायण लोहिया यांनी व्यक्त केला.

शाहू बँकेच्या निवडणुकी निमीत्त अंबाजोगाई येथील मेळाव्यामध्ये ते बोलत होते. व्यासपीठावर बँकेचे विद्यमान अध्यक्ष इंजि.अजय पाटील, नानासाहेब गाठाळ,अनिलराव आगळे,सतीश झंवर यांच्यासह रावसाहेब आगळे, ऍड.शहाजीराव जगताप,इंजि.प्रकाशराव भांडेकर, श्रीरंगराव गोरकर, प्रा.नारायणराव मस्के, प्रा.विक्रमराव जाधव, इंजि.अभय कदम, रामहरी गव्हाणे, आणि बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, सभासदांना बँकेच्या माध्यमातुन अद्यवत सेवा दिली जात आहे. हजारो तरुणांना उद्योग व्यवसायासाठी वित्तीय सहाय्य देवून स्वतः च्या पायावर उभे केले आहे. सुमारे ५०० कर्मचारी बँकींगच्या माध्यमातुन कार्य करत आहेत. विरोधकांकडे बँकेच्या विकासाचा कोणताही अजेंडा नसुन ते केवळ सभासदांची दिशाभुल करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत. सुज्ञ सभासद त्यांना त्यांची जागा दाखवुन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बँकेचे विद्यमान अध्यक्ष इंजि.अजय पाटील यांनी बँकेच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल सभासदांसमोर मांडला. बँक स्थापनेपासून नफ्यात असून, दरवर्षी नफ्यात असणारी आणि नियमीतपणे पुरस्कारास प्राप्त ठरणारी आपली बँक आहे. मराठवाड्यातील नामांकित बँक म्हणून आपली बँक उदयास आली आहे. बँकेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे अमुल्य असे योगदान आहे. सभासदांना, अद्यावत सेवा देण्याच्या हेतून एटीएम, युपीआय, फोन-पे, गुगल-पे, बँकींगची सुविधा संचालक मंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. कोव्हीड -१९ च्या प्रतिकुल परिस्थितीमध्येही बँकेने प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे. प्रतिकुल परिस्थितीमध्येही बँकेच्या ठेवी आणि कर्ज वितरण वाढले असून बँकेचा नेट एन.पी.ए.१%पेक्षा कमी आहे. हे सर्व सभासदांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. सभासदांच्या हिताला बाधा येईल असे कोणतेही कृत्य संचालक मंडळाच्या हातुन होणार नाही याची पुर्ण ग्वाही त्यांनी दिली. विरोधकांनी वैयक्तीक हेवेदाव्यातून निवडणुक लादली आहे. माझे वडीलांचा फोटो वापरुन विरोधक मते मागत आहेत. त्यांना त्यांची जागा सभासद दाखवुन देतील असा मला पुर्ण विश्वास आहे. तरी येणार्या निवडणुकीमध्ये जनाधार पॅनलच्या ढाल-तलवार या चिन्हावर मतदान करुन सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी स्थानिक सभासदांनी जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. सदर सभेस मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!