Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईविलिनीकरणाबाबत निर्णय होईपर्यंत थेट पगारात वाढ

विलिनीकरणाबाबत निर्णय होईपर्यंत थेट पगारात वाढ


१० तारखेच्या आत वेतन केले जाईल; अनिल परब यांची विधानसभेत माहिती
मुंबई (रिपोर्टर) राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज देखील विरोधकांनी सकाळीच पार्‍यांवर निदर्शने केली. यानंतर अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परबांनी एसटी संपाविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे अनिल परब म्हणाले. तसेच एसटीच्या संपामुळे साडेसहा कोटींचे नुकसान झाले आहे. अशी माहिती अनिल परबांनी दिली.
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत सरकार सकारात्मक एसटी संपादरम्यान ३६ कर्मचार्‍यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसदारांना नोकरी देणार का? असा सवाल भाजप आमदार श्वेत महाल्लेंकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना परिवहन मंत्री परब म्हणाले की, ’एसटीच्या ३६ कर्मचारी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या वारसांना नोकरी देण्याविषयी सरकारची सकारात्मक भूमिका आहे. याविषयी माहिती घेतली जात आहे. आत्महत्या कशामुळे झाल्या? हे तपासणार जाणार असल्याचे देखील अनिल परब म्हणाले.

Most Popular

error: Content is protected !!