Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी नगरपंचायतच्या उर्वरित ४ प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहीर

आष्टी नगरपंचायतच्या उर्वरित ४ प्रभागाचे अंतिम आरक्षण जाहीर

प्रभाग क्रं.३ सर्वसाधारण ,
प्रभाग क्र.४ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रं.६ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रं.११ सर्वसाधारण

आष्टी (रिपोर्टर) :- आष्टी नगरपंचायतचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने आरक्षित ४ वार्डच्या निवडणूका रद्द झाल्या होत्या या ४ वार्डचे आरक्षण आज दि.२३ डिसेंबर रोजी तहसिलदार कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार विनोद गुंडमवार,मुख्याधिकारी निता अंधारे, व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत होऊन आरक्षण जाहीर केले असून ४ प्रभाग असणार आहेत.


आष्टी नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून, प्रशासनाने या नगरपंचायतीची उर्वरित प्रभागाची आरक्षण अधिसूचना जाहीर केली आहे.आरक्षण जाहीर झाल्यामुळे निवडणुकीसंदर्भात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आष्टी नगरपंचायतीची एकूण नगरसेवक संख्या ही १७ असून, यापैकी १३ प्रभागाच्या निवडणूका २ दिवसांपूर्वी झाल्या असून उर्वरित ४ प्रभागाचे आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे.२ प्रभागामध्ये महिला व २ सर्वसाधारण पुरुष अशी आरक्षण सोडत जाहीर असून या प्रभागाचे मतदान १८ जानेवारी रोजी होऊन सर्व १७ प्रभागाची मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!