Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeबीडमहाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक

महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण करणार विजयाची हॅट्रीक


सुजान पदवीधर मतदारांची सतिष चव्हाणांनाच सर्वत्र साथ
गेवराई (रिपोर्टर)-महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, इंदिरा कॉंग्रेस आणि शिवसेना तसेच इतर मित्रपक्षांच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण विजयाची हॅट्रीक करणार असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकदिलाने कामाला लागल्यामुळे सतिष चव्हाण यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही, सक्षम प्रचार यंत्रणा, शिस्तबध्द नियोजन, सुजान पदवीधर मतदारांशी साधलेला सुसंवाद यामुळे सतिष चव्हाण प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असून विरोधकांची ढासळलेली प्रचार यंत्रणा विविध ठिकाणी झालेली बंडखोरी सतिष चव्हाण यांच्या पथ्थ्यावर पडणार असल्यामुळे सतिष चव्हाण यांच्या विजयार शिक्कामोर्तब झाले आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतिष चव्हाण यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्रित कामाला लागल्यामुळे सतिष चव्हाण यांना सर्वत्र पाठिंबा मिळत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात घटक पक्षातील विविध नेते आणि पदाधिकार्यांनी मतदार संघात केलेल्या झंझावातील प्रचार दौर्याने सतिष चव्हाण यांनी ताकद वाढली असून त्यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही. महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे सतिष चव्हाण हेच विजयाची हॅट्रीक करणार असून सुजान मतदारांची सर्वत्र सतिष चव्हाण यांनाच एक नंबरची पसंती असल्याचे चित्र निर्माण झाली आहे. सतिष चव्हाण यांच्या मागील कार्यकाळामध्ये त्यांनी पदवीधरांसह सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची मोठ्या प्रमाणावर सोडवणुक केलेली आहे. शिस्तबद्ध आणि सक्षम प्रचार यंत्रणा आणि पदवधीरांशी साधलेला सुसंवाद हेच सतिष चव्हाणांचे पाठबळ आहे. पदवीधर मतदारांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता सतिष चव्हाण यांना एक नंबरच्या पसंतीचे मतदान करून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील नेते आणि पदाधिकार्यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!