Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकोरोना टेस्ट नंतरच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परवानगी

कोरोना टेस्ट नंतरच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात परवानगी

बीड (रिपोर्टर)ः- ओमीक्रोनचा धोका पाहता आरोग्य प्रशासन सतर्क झालं. कोरोनाचे लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी आरोग्य विभाग आवाहन करत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी आता नातेवाईकांना मास्क बंधनकारक करत त्यांची ऍन्टीजन टेस्ट केली जात आहे. आज सकाळी रुग्णालयाच्या दारात टेस्टसाठी रांग लागली होती.


राज्यामध्ये ओमीक्रोनचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य प्रशासन चांगलेच दक्ष झाले आहे. लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जावू लागला. मास्क बंधनकारक करण्यात आले. जिल्हा रुग्णालयामध्ये जातांना आता प्रत्येकांने मास्क वापरावे असे आदेशीत करण्यात आले असून आज सकाळी रुग्णांच्या नातेवाईकांची ऍन्टीजन टेस्ट करुनच त्यांना आतमध्ये सोडण्यात आले आहे. टेस्ट करण्यासाठी नागरीकांची रांग लागली होती.

Most Popular

error: Content is protected !!