Sunday, October 17, 2021
No menu items!
Homeबीडबिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत

बिबट्याला पकडण्यासाठी ताडोबा जंगलातले एक्सपर्ट आष्टीत


बिबट्या पाथर्डी परिसरातून आला, सकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू
आष्टी/बीड (रिपोर्टर)- नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तिघा जणांचा बळी घेतल्याने आष्टीसह पाटोदा आणि शिरूर तालुक्यात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टिम तालुक्यात दाखल असली तरी बिबट्या अद्यापही सापडत नाही. जोगेश्वरी पारगाव शिवारात आज सकाळपासूनच वनविभागाच्या चार पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. चंद्रपूर येथील विशेष पथकही या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आज दाखल होणार असल्याचे विभागीय वन अधिकारी मुंडे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने आष्टी तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. आतापर्यंत तिघा जणांचा या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे १७ पथके तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. मात्र अद्यापही या अधिकार्‍यांना बिबट्याला पकडण्यास यश आलेले नाही. काल जोगेश्वरी पारगाव शिवारातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला. त्यामुळे तालुक्यात अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज सकाळपासून वन विभागाने जोगेश्वरी पारगाव शिवारात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनमध्ये वनविभागाचे चार पथके आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबाच्या जंगलातील अनुभवी विशेष पथक मागवण्यात आले असून हे पथक आज आष्टीमध्ये दाखल होणार आहे. हा बिबट्या पाथरी परिसरातून आला असावा, अशी शंकर वनविभागाने व्यक्त केली असून या बिबट्याचे वय ४ ते ५ वर्षे आहे. मानवी रक्ताची चटक लागल्याने तो नरभक्षक झाल्याचे विभागीय वन अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!