Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईअधिकार्‍यांकडे नोटाच मिळायला लागतात; तुकाराम सुपेंवरील कारवाईवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया

अधिकार्‍यांकडे नोटाच मिळायला लागतात; तुकाराम सुपेंवरील कारवाईवरुन अजित पवारांची प्रतिक्रिया


मुंबई (रिपोर्टर)

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी ठेवण्यास दिलेले 58 लाख रुपये नातेवाईकांनी सायबर पोलिसांकडे जमा केले आहेत. त्याशिवाय सुपे यांच्याकडून उसने घेतलेले पाच लाख रुपयेही एकाने पोलिसांकडे परत आणून दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी जप्त केलेली रक्कम तीन कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. म्हाडा प्रश्‍नपत्रिका फुटीचा तपास करताना टीईटी परीक्षा निकालात फेरफार झाल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली. चौकशीत सुपे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!