Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगुटखा माफिया मुळेची कुमावतांकडून चौकशी सुरू

गुटखा माफिया मुळेची कुमावतांकडून चौकशी सुरू


बीड (रिपोर्टर) पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटख्यावर एसपींच्या विशेष पथकाने धाड टाकून जप्त केलेल्या गुटख्यात गुटखा माफिया आबा मुळेवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात काल त्याला एमसीआर मिळाल्यानंतर कुमावतांनी केलेल्या नेकनूरमधील कारवाईत त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली असून दस्तुरखुद्द सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत हे त्याची चौकशी करत आहेत.


महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात आबा मुळे गुटखा विक्री करत होता. त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तो या गुटख्याची सर्रासपणे वाहतूक आणि विक्री करत होता. मध्यंतरी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोठ्या गोडाऊनवर कारवाई करून लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात आबा मुळेवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला बीडमधून अटक करत न्यायालयात हजर केले होते. काल त्या गुन्ह्यात त्याला एमसीआर मिळाल्यानंतर कुमावतांनी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा पकडून आबा मुळेवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काल पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. तथा आयपीएस कुमावत हे गुटखा माफिया मुळेची चौकशी करत आहेत. त्यामुळे आबाच्या धंद्यात कोण कोण आहेत हे लवकरच समोर येईल.

Most Popular

error: Content is protected !!