Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा गेवराईत शिवप्रेमींकडून निषेध

कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा गेवराईत शिवप्रेमींकडून निषेध


गेवराई (रिपोर्टर) कर्नाटक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ आज गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवप्रेमींनी एकत्र येत जाहीर निषेध केला.

दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रथम शिवरायांचा पुतळा ठेवून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व यानंतर या घटनेबाबत अखंड हिंदुस्तानमधील सर्व शिवप्रेमींच्या भावना समजावून घेत कर्नाटक सरकारने संबधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी स्वस्त बसणार नसल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा प्रचंड जयजयकार करत या घटनेचा जाहिर निषेध केला. तर लवकरात लवकर ही कारवाई करावी अन्यथा शिवप्रेमींच्या वतीने देशभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारू असा इशाराही उपस्थित शिवप्रेमींनी दिला. यावेळी गेवराई शहरासह तालुक्यातील शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!