Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeशेतीमोदी सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत? केंद्रीय कृषीमंत्र्यांचं मोठं विधान

मोदी सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत? केंद्रीय कृषीमंत्र्यांचं मोठं विधान


नवी दिल्ली (वृत्तसेवा) देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकर्‍यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आता मोठं विधान केलं आहे. हे तीनही कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. यानंतर संसदेतही विधेयक मंजूर करण्यात आलं. यासोबत दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणार्‍या शेतकरी पुन्हा आपल्या घरी परतले.


एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी कायदे रद्द होण्यासाठी काही लोक जबाबदार असल्याचं म्हटलं. तसंच हे तीनही कृषी कायदे पुन्हा नव्याने आणले जाऊ शकतात असं सांगितलं.

Most Popular

error: Content is protected !!