Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या


कुक्कडगाव (रिपोर्टर)- एका २० वर्षीय तरुणाने घरासमोरील चिंचाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रग्णालयात पाठवला.
निखिल किसन बोरवडे (रा. भाटसांगवी ता. बीड, वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी जमीन विकली तरीदेखील कर्ज फिटले नाही त्यामुळे आलेल्या नैराश्यातून युवकाने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. निखिल बोरवडे याचे गावात पंक्चरचे दुकान होते.

Most Popular

error: Content is protected !!