Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआरक्षणाच्या रास्त मागणीसाठी कलेक्टर कचेरीवर कवठेकरांचा ठिय्या

आरक्षणाच्या रास्त मागणीसाठी कलेक्टर कचेरीवर कवठेकरांचा ठिय्या


तीन दिवसाच्या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन
बीड (रिपोर्टर) आरक्षणापासून वंचीत राहिलेल्या राज्यातील ७० टक्के म्हणजेच साडेआठ कोटी समुदायास न्याय मिळवण्यासाठी या न्यायालयीन लढ्यात सामील व्हा, या बसा समजून घ्या म्हणत मराठवाडा संघर्ष समितीचे सदस्य शिवाजी कवठेकर यांनी आजपासून उपोषण सुरू केले असून ओबीसींची मोजणी करा या मागणीसाठी तीन दिवसीय उपोषण सुरू केलं आहे.


राज्यात जास्तीत जास्त आठ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींची आरक्षण पात्रता केवळ ४ टक्के असताना त्यांना २७ टक्क्यांचा कोटा बहाल करून आरक्षणाबाहेरल ७० टक्के खुल्या वर्गावर जो अन्याय झाला तो दुरुस्त करण्याकरिता ओबीसींची तात्काळ मोजणी करून त्यांच्या कायदेशीर पात्रतेनुसार त्यांना आरक्षण देण्यात यावे व उर्वरित २१ ते २२ टक्के हे खुल्या वर्गाला उपलब्ध करून द्यावे या मागणीकरिता आजपासून तीन दिवसांचे उपोषण मराठवाडा संघर्ष समितीचे सदस्य शिवाजी कवठेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे. सदरचा लढा ते गेल्या अनेक दिवसांपासून लढत असून आरक्षणाबाबतच्या रास्त मागणीसाठी कवठेकर हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!