Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीड‘एक धाव कुटुंबासाठी’ला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, मॅराथॉनमध्ये हजारोंचा सहभाग

‘एक धाव कुटुंबासाठी’ला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, मॅराथॉनमध्ये हजारोंचा सहभाग

आ. मेटेंची जनतेच्या आरोग्यासाठी धडपड
बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील तरुणांसह नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रतिवर्षी कुठला ना कुठला कार्यक्रम घेत जनजागृती करणारे शिवसंग्रामचे सर्वेसर्वा तथा आ. विनायक मेटे यांच्या एक धाव कुटुंबासाठीच्या मॅराथॉन स्पर्धेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवरून ८ कि.मी. व १० कि.मी.ची मॅराथॉन स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरू झाली. यातील विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र सकाळी झालेल्या या मॅराथॉन स्पर्धेत तरुणांसह अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला होता. या वेळी आ. मेटेंनी आरोग्यासाठी व्यायाम महत्वाचे असल्याचे सांगत सकारात्मक विचाराची व्यायामाशी सांगड घाला, असे आवाहन केले.

IMG 20211226 WA0001


छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर बीड शहरासह जिल्ह्यातील अन्य गावांमधून एक धाव कुटुंबासाठीच्या मॅराथॉन स्पर्धेत अनेकांनी सहभाग नोंदवला. चित्रपट अभिनेता देवदत्त नागे, स्नेहा कोकणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षांपासून अवघ्या जगाला कोरोनाने ग्रासून टाकले आहे. यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे. जे व्यायाम करतात, सकारात्मक विचार ठेवतात अशांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे असल्याचे सांगत सातत्याने जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याबाबत जागरुक राहत व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेणारे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मॅराथॉनचे आयोजन केलेले होते. एक धाव कुटुंबासाठीच्या आ. मेटेंच्या हाकेला बीड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी साद देत हजारो तरुणांनी मॅराथॉनमध्ये सहभाग नोंदवला. ८ कि.मी., १० कि..मी.ची ही स्पर्धा होती. वेगवेगळ्या वयोगटातील तरुणांसह अबालवृद्धांनी यात सहभाग नोंदवला होता.

266316650 901284280576963 8233156569176537548 n

यातील विजेत्यांना लवकरच प्रमाणपत्रासह ट्रॉफी देण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाल्यानंतर आ. मेटेंनी उपस्थितांना आरोग्याकडे लक्ष देण्याबरोबर सकारात्मक विचार ठेवण्याचे आवाहन केले. राजकारण करत असताना आपण समाजकारणाला अधिक महत्व देतो आणि हे समाजकारण करायचे असेल अथवा राजकारण करायचे असेल तर आरोग्य उत्तम ठेवणे नितांत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!