Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमवाळुच्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वारास चिरडले राक्षसभुवन फाट्याजवळ घडली घटना

वाळुच्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वारास चिरडले राक्षसभुवन फाट्याजवळ घडली घटना

दोषींविरोधात कारवाई झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही
गेवराई (रिपोर्टर)- वाळु घेऊन जाणार्‍या एका ट्रॅक्टरने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी राक्षसभुवन फाटा येथे घडली. घटनेनंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला आहे.


तुकाराम बाबुराव निंबाळकर (वय ४२, रा. खामगाव) हे गावाकडून गेवराईकडे मोटारसायकलवर जात होते. राक्षसभुवन फाट्याजवळ अवैध वाळु घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरने त्यांना पाठिमागून जोराची धडक दिली. या अपघातात निंबाळकर गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाले. घटनेनंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून गेला आहे. दरम्यान राक्षसभुवन सह परिसरातून अवैध वाळुचा उपसा सुरू असून दोषींविरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही. ट्रॅक्टर चालकाविरोधात कठोर कारवाई केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, असा आक्रमक पवित्रा खामगाव ग्रामस्थ घेणार असल्याचे सांगण्णयघात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!