Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भोजन भत्त्यात कपात शिक्षक संघटनांनी केली नाराजी व्यक्त

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भोजन भत्त्यात कपात शिक्षक संघटनांनी केली नाराजी व्यक्त


बीड (रिपोर्टर) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वस्तीगृहातील मुलांच्या भोजन भत्त्यात कमी करून तो प्रत्येक जेवण ४७ रुपयांऐवजी ३३ रुपये करण्यात आल्यामुळे या ऊसतोड कामगारांच्या पालकांनी आणि संघटनांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी दोन वेळच्या जेवणासाठी महिन्याला साडेआठ हजार रुपये शालेय शिक्षण समितीला शिक्षण विभागाकडून दिले जायचे. प्रती भोजन ४७ रुपये या प्रमाणे पुर्वी शिक्षण विभागाकडून शिक्षण समितीला दिले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवणाची प्रतवारी चांगली होती. मात्र यामध्ये कोणतीही माहिती न घेता अचानकपणे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ४७ रुपयांऐवजी ३३ रुपये करून महिन्याला साडेसहा हजार रुपये बील देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी शिक्षण विभागाला सीईओ मार्फत भोजन भत्त्यात कपात करू नये, अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये या बाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केल्यानंतर ३३ रुपयात दोन वेळचे जेवण कसे द्यायचे त्यामुळे हे काम करण्यास काही शिक्षण समित्यांनी नकारही दिला होता मात्र शिक्षण विभागाने तात्पुरती समज देऊन वर याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी पत्र व्यवहार केलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!