Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी तालुक्यातील वेताळवाडी चिकन गुनियाचे ५० पेक्षा अधिक रुग्ण

आष्टी तालुक्यातील वेताळवाडी चिकन गुनियाचे ५० पेक्षा अधिक रुग्ण


किन्हीचे उपकेंद्र कायमस्वरूपी बंद, कर्मचारी फक्त नावालाच


आष्टी (रिपोर्टर) तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या वेताळवाडी येथे ५० पेक्षा अधिक चिकनगुनिया सदृश्य रोगाचे पेशंट मोठ्या प्रमाणात आहेत बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री विमलताई मुंडदा यांनी किन्ही येथे आरोग्य उपकेंद्र मंजुर केले आहे या बाबीला अनेक वर्ष होऊन गेले मात्र हे आरोग्य उपकेंद्र फक्त नावाला आहे ते दिवसभर बंद असते या ठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असल्याचे समजते मात्र हे कर्मचारीही या ठिकाणी येत नाहीत विशेष म्हणजे वेताळवाडी येथे मोठ्या प्रमाणात चिकनगुनिया चे पेशंट सापडून सुद्धा अद्याप पर्यंत या उपकेंद्राचे कोणीही या गावाकडे डोकावून सुद्धा पाहिले नाही.

आज सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांना वेताळवाडी येथिल माजी सैनिक देविदास वणवे यांनी या बाबीची माहिती देताच काकडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी राऊत साहेब तसेच तालुका आरोग्य अधिकारी जयश्री शिंदे यांना या बाबतची माहिती दिली आपण तात्काळ या ठिकाणी टीम पाठवतो असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितल्या चे दत्ता काकडे म्हणाले वेताळवाडी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडले ते वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात उपयोग उपचार घेत आहेत मात्र शासकीय आरोग्य यंत्रणा येथील उपकेंद्रात कार्यरत आहे त्यांना या घटनेची माहिती सुद्धा नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!