Thursday, October 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाकरोना नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष

करोना नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष

करोनानं प्रकोप अजूनही सुरूच आहे. दिवसेंदिवस करोनाच्या लक्षणांमध्ये बदल होताना दिसत असून, आता एका नव्या अभ्यासातून चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. करोना विषाणू नाकावाटे मेंदू शिरकाव करू शकतात, अशी भीती एका संशोधनाअंती व्यक्त करण्यात आली आहे.

जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेनं केलेल्या संशोधनाचा अहवाल नेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात हा धोका व्यक्त करण्यात आला आहे. सार्स सीओव्ही २ (कोविड) केवळ मानवी श्वसन संस्थेवरच परिणाम करत नाही. तर मज्जासंस्थेवरही परिणाम करत आहे. याचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे गंध न येण चव जाणे, डोकेदुखी, थकवा, मळमळ आणि उलट्या यासारख्या न्यूरोलॉजिक लक्षणांचा एक तृतीयांशपेक्षा जास्त व्यक्तींना त्रास होतो, असं अभ्यासात म्हटलं आहे.

संशोधकांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा अभ्यास केला. यात २२ पुरूष व ११ महिला होत्या. या अभ्यासात श्वसन नलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागात परिक्षण करण्यात आलं. ज्या ठिकाणी करोनाचा सर्वात आधी संसर्ग होतो. या रुग्णांचं मृत्यूवेळी वय ७१ होतं. तर करोनाची लक्षणं आढळून आल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं अभ्यासकांनी सांगितलं. संशोधकांनी सांगितलं की त्यांना सार्स-सीओव्ही २ चे अनुवांशिक घटक मेंदू आणि श्वसन नलिकेच्या भागात दिसून आले. विषाणूचे कणही आढळून आले आहेत, असा दावाही संशोधकांनी केला आहे.

करोनाचा उद्रेक झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात सर्दी, खोकला आणि घशात खवखव होणे हीच लक्षणं सांगण्यात येत होती. मात्र, त्यानंतर करोनाच्या लक्षणांमध्ये भर पडत गेली. काही दिवसानंतर करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना गंध न येणे, चव जाणे ही लक्षणं दिसून येऊ लागली. ही करोनाची लक्षणं असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्यांचा करोनाच्या लक्षणांमध्ये समावेश केला होता.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!