Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडबीडच्या रूईकर कुटुंबियांना दुसर्‍या दिवशीही शिवसेनेच्या मदतीचा ओघ सुरूच

बीडच्या रूईकर कुटुंबियांना दुसर्‍या दिवशीही शिवसेनेच्या मदतीचा ओघ सुरूच


एकनाथ शिंदेंनी स्विकारले पालकत्व

बीड (रिपोर्टर) तिरूपतीला जाताना मृत्युमुखी पडलेल्या सुमंत रूईकर यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी दुसछया दिवशीही शिवसेनेच्या मदतीचा ओघ सुरूच होता. शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची पाच लाख रूपयाची तात्पुरती मदत आज पोहच करण्यात आली. आठवडाभरात एकनाथ शिंदे हे रूईकर कुटुंबियांना भेटण्यासाठी बीडमध्ये दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वास्थ्य लाभावे यासाठी बीड ते तिरूपती पायी वारी करताना रस्त्यातच मृत्युमुखी पडलेल्या सुमंत रूईकर यांच्या उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना शिवसेनेने मोठा आधार दिला. दुसछया दिवशीही शिवसेनेचा मदतीचा ओघ सुरूच होता. मंगळवारी सकाळी शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्विय सहाय्यक बाजीराव चव्हाण यांनी रूईकर कुटुंबियाची भेट घेवून पाच लाख रूपये रोख त्यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द केली. तत्पूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलवरून रूईकर कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांचे सांत्वन केले. या संपूर्ण कुटुंबाचे पालकत्व आपण स्विकारत आहोत. पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष भेटीला येवू त्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम करून देवू असा शब्द त्यांनी दिला. आज पाच लाख रूपयाची तात्पुरती मदत रूईकर कुटुंबियाकडे पोहच केली. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, वुैंडलिक खांडे, किसान सेनेचे जिल्हासंघटक परमेश्वर सातपुते, उपजिल्हाधिकारी सुशिल पिंगळे, दिलीप गोरे, अभिजित बरिदे, किशोर जगताप, सुनील सुरवसे, गणेश उगले, बाळासाहेब आंबेकर हे उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!