Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमराठवाड्यात बँकांचाही अनुशेष ! साडेनऊ हजार व्यक्तीमागे एक बँक

मराठवाड्यात बँकांचाही अनुशेष ! साडेनऊ हजार व्यक्तीमागे एक बँक


औरंगाबाद (रिपोर्टर) मराठवाड्यात बँकांचाही अनुशेष असून शाखांची संख्या आणि लोकसंख्या निहायही पुरेशा वित्तीय संस्था नसल्याने मराठवाड्यातील माणसाच्या अडचणी कायम आहेत.

याचा विचार करून मराठवाड्यातील मागासपणाचा विचार करून पहिल्यांदाच केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक प्रादेशिकस्तरावर आयोजित केली आहे. मराठवाड्यातील शेती, कर्जवाटप, बँकांची सुविधा यावर लातूर येथे 24 डिसेंबर रोजी बैठक होणार असून या बैठकीपूर्वी असुविधांची जंत्रीही मांडली जात आहे.विलीनीकरणानंतर मराठवाड्यातील बँकांच्या शाखांची संख्या कमी झाली असून लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या मराठवाड्यात सर्वात कमी आहे. मराठवाड्यात नऊ हजार 676 लोकसंख्ये मागे बँक आहे. विदर्भ, कोकण, उर्वरित महाराष्ट्र आणि मुंबईच्या तुलनेत लोकसंख्येमागे बँकेचे हे प्रमाण अधिक चांगले आहे. बँका नसल्याने कर्ज मिळण्यात येणार्‍या अडचणींना मराठवाड्यातील व्यक्तींना अधिक सामोरे जावे लागते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!