Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा अजब कारभार


अभियांत्रिकी सल्लागार पदासाठी 5 वाजता
ठेवल्या मुलाखती; मुलाखती रद्द करण्याची केली मागणी

बीड (रिपोर्टर):- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प.अंतर्गत अभियांत्रिकी सल्लागाराच्या आज पाच वाजता मुलाखती ठेवलेल्या आहेत. सदरील हा प्रकार आश्‍चर्यकारक असून सायंकाळी मुलाखती ठेवण्याचा हा अजब प्रकार आहे. मुलाखती रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली जावू लागली आहे.


जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अनुभवी अभियांत्रिकी सल्लागार ई-निविदा दि.13.12.2021 रोजी प्रसिद्ध केली होती. सदरील ई-निविदेतील अनुभवी अभियांत्रिकी सल्लागाराची मुलाखत दि.28.12.2021 रोजी सायंकाळी 5 वाजता ठेवली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सायंकाळच्या वेळी मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत. सध्या एसटी महामंडळाचा संप असल्याने बस सेवा बंद आहे. ओमिक्रॉनच्या प्रभावामुळे कलम 144 नुसार जबावबंदी आहे. तसेच अभियंत्यांना कोणत्याही सूचना दैनिकात प्रसिद्धी माध्यमांच्याद्वारे किंवा मोबाईल, टपाल, ई-मेल संदेश आलेले नाहीत. त्यामुळे अभियंत्यांचे अतोनात हाल होणार असून मुलाखतीस संबंधितांना पोहचण्यास अडचणी निर्माण होणार आहे. सदरील आजच्या या मुलाखती रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!