Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमजिल्हा रुग्णालयात रात्री ब्रदरला मारहाण

जिल्हा रुग्णालयात रात्री ब्रदरला मारहाण


बीड (रिपोर्टर)- जखमीवर ड्रेसिंग करण्याच्या कारणावरून एका ब्रदरला रात्री मारहाण करण्यात आली. ही घटना साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विश्वंभर आरसुळे हे रात्री अपघात विभागामध्ये ड्युटीवर होते. साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान अक्षय लाड हा युवक उपचारासाठी रुग्णालयात आला होता. लाड याने डॉक्टरास दाखविल्यानंतर ड्रेसिंग करण्यास सांगितले. ड्रेसिंग करण्याच्या कारणावरून लाड याने आरसुळे विश्वांभर यांना मारहाण केली. या प्रकरणी आरसुळे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!