नेकनूर/परळी (रिपोर्टर):- भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने रस्ता ओलांडत असणार्या एका सत्तर वर्षीय वृद्धाला जोराची धडक दिल्याने सदरील वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी कोळवाडी येथे घडली. दुसरी अपघाताची घटना परळी, सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडली. अॅटोला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात चौघे जण जखमी झाले.
शंकर तात्या जाधव (रा.कोळवाडी वय 70 वर्षे) हे रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव वेगात येणारा टेम्पो क्रमांक एम.एच.19 झेड 9497 ने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार जाले. या प्रकरणी चालक दिनेश दौलत जाधव रा.बीलवाडी ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पीएसआय गिते, पीएसआय घोडके, पोलीस कर्मचारी जाधवर, शेख अल्ताफ, विलास ठोंबरे, किशोर जाधव, मारोती म्हेत्रे, विठ्ठल सांगळे, सुदाम वनवे, विकास थोरात यांनी जावून पंचनामा केला. दुसरा अपघात परळी सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडला. रिक्षा क्र.एम.एच.23 टी.आर. 311 हा प्रवाशी घेवून जात होता. याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात शिवमुर्ती रोडे, वनुबाई माने, आशाबाई फड, सागरबाई फड व अन्य लहान मुले जखमी झाले. जखमींना परळी व अंबाजोगाई रूग्णालयात दाखल करण्यात आले.