गढी – माजलगाव रोडवरील भेंड टाकळी फाट्याजवळील घटना
गेवराई (रिपोर्टर) राष्ट्रीय महामार्ग 52 यावर गढी- माजलगाव रोडवरील भेंड टाकळी फाट्या नजीक उसाच्या ट्रॉलीला स्कार्पिओने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एक जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे पाचच्या सुमारास घडली.
या अपघातात लिंबाजी उत्तम चौरे वय वर्ष 30 हे मयत झाले तर गणेश गोपाळ चौरे, कैलास सखाराम चौरे वय 25 वर्ष, विकास कांबळे, आसाराम नेहरकर वय 35 वर्ष यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण पाथरी तालुक्यातील असून ते चक-14 ऋउ – 1408 या स्कार्पिओ गाडीतून पुण्यावरून पाथरीकडे जात असताना आज पहाटे पाचच्या दरम्यान भेंड टाकळी फाट्याजवळ समोर चालत असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला त्यांच्या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि वाघमोडे यांच्यासह पोलीस हे.कॉ. डोंगरे, विठ्ठल चव्हाण, आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.