Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड‘समृध्दी’ पॅलनच्या चारीमुंड्या चित सर्वांचे डिपॉझीट जप्त

‘समृध्दी’ पॅलनच्या चारीमुंड्या चित सर्वांचे डिपॉझीट जप्त


सभासद मतदारांचा ‘जनाधार’ पॅनललाच पुर्ण कौल; श्री छत्रपती राजर्षी शाहू बँकेवर पुन्हा एकदा इंजि.अजय पाटील यांचे वर्चस्व


बीड (रिपोर्टर):- येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप.बँकेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीची मतमोजणी २८ डिसेंबर रोजी पार पडली.या निवडणूकीतही बँकेच्या बहाद्दर सभासद मतदारांनी पुन्हा एकदा ’जनाधार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना ’ढाल-तलवार’ या चिन्हावर प्रचंड मतांनी विजयी करत विद्यमान संचालक मंडळावर असलेला अढळ विश्वास दाखवून दिला. शिवाय विरोधकांच्या ’समृध्दी’ पॅनलला चारीमुंड्या चित्त करत त्यांच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझीट जप्त करत त्यांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत ’जनाधार’ चे सर्वच १९ उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याची माहिती जनाधार पॅनल प्रमुख इंजि.अजय पाटील यांनी दिली.


बीड येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेची सन २०२१ ते २०२६ साठीच्या पंचवार्षिक निवडणूकीत बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.इंजि.अर्जुनराव लक्ष्मणराव जाहेर पाटील यांचे चिरजीव तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष इंजि.अजय अर्जुनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ’जनाधार पॅनल’अंतर्गत उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले. इंजि.अजय पाटील यांच्याविरुध्द त्यांचे चुलते इंजि.बलभीमराव पाटील यांनी ’समृध्दी’ पॅनल उभा करून निवडणुक लढवली होती. मात्र चुलत्या – पुतण्याच्या या लढाईत पुतण्याने चुलत्याला मात दिली आहे. निवडणुकी दरम्यान विरोधकांनी विद्यमान संचालक मंडळावर खोटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण बँकेच्या सुज्ञ सभासदांनी त्यांना पराभूत करून विद्यमान संचालक मंडळावरील अढळ विश्वास दाखवून दिला. या निवडणूकीच्या प्रचाराच्या पहिल्या दिवसांपासूनच सभासदांनी ’ जनाधार पॅनलच्या सर्व उमेदवारांना ’ढाल – तलवार’ या चिन्हावर प्रचंड मताधिक्य देवून विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. तसेच बँकेच्या सर्वच शाखांच्या ठिकाणी पॅनल प्रमुख इंजि.अजय पाटील व सर्व उमेदवारांनी सभासद मतदारांचे मेळावे घेवून त्यांना जनाधार पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला बँकेच्या सभासदांनी मोठा प्रतिसाद दिला आणि ’जनाधार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी केले आणि विरोधकांच्या ’समृध्दी’ पॅनलला चारीमुंड्या चित करून त्यांना पराभवाची धूळ चारली.


श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ’जनाधार’ पॅनल प्रमुख इंजि.अजय अर्जुनराव पाटील यांच्यासह, ऍड. सत्यनारायण छगनलाल लोहिया, रावसाहेब दत्तात्रय आगळे, अभय किसनराव कदम , इंजि.अनंतराव रामचंद्र काळकुटे, बलभीम नथुबा कुटे,श्रीरंग अंबादास गोरकर , रामहरी दगडु गव्हाणे,शंकुतला श्रीराम गव्हाणे,ऍड. शहाजीराव दगडोजी ऊर्फ दगडुबा जगताप , विक्रम व्यंकटराव जाधव ,ऍड.पांडुरंग आश्रुबा भोसले, प्रा.नारायण नरहरी ऊर्फ नरहरराव मस्के, निलेश गुलाबचंद लोढा, डॉ.अनुजा बालाजी फलके राजुबाई लिंबण्णा मोरे , प्रकाश बाबुराव भांडेकर,सुर्यभान किसनराव भोसले , डॉ.विनिता राजेंद्र ढाकणे हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.


सर्व सभासदांचे इंजि.अजय पाटील यांनी मानले आभार
सभासदांचे हित आणि त्यांचा विश्वास हेच आपले ध्येय समजून वाटचाल करणार्‍या श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को -ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ’जनाधार’ पॅनलच्या सर्व उमेदवारांना सभासदांनी प्रचंड मतांनी विजयी केले.या निवडणुकीत विरोधकांनी विद्यमान संचालक मंडळावर बिनबुडाचे आरोप केले, मात्र सभासदांवर त्याचा परिणाम झाला नाही.उलट याच सभासदांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून विद्यमान संचालक मंडळाला सेवा करण्याची पुनश्च संधी दिली. हा विजय बँकेच्या सर्व सभासदांचा आहे अशा शब्दात पॅनल प्रमुख इंजि.अजय पाटील यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी सभासदांचे मनःपुर्वक आभार मानले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!