Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकरण पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण शिबीरात अनेकांनी घेतली लस

करण पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण शिबीरात अनेकांनी घेतली लस


बीड (रिपोर्टर) शिवसेना युवा नेते करण बंडू पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी भाजी मंडई या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला अनेकांनी उपस्थिती दर्शविली होती. शिबिरात अनेक नागरिकांनी लसीकरण करून घेतले.


करण बंडू पिंगळे यांचा वाढदिवस असल्याने या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवत भाजी मंडई, पिंगळे गल्ली या ठिकाणी कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपजिल्हाप्रमुख बंडु पिंगळे, उपजिल्हाप्रमुख सुशिल पिंगळे, चेअरमन राजेश पिंगळे, बबन पिंगळे, अंबादास सुसकर, लखन जगताप, चंदु ठोंबरे, शेख शाहेद, रविंद्र इंगोले, अभी पिंगळे, विशाल भड, निखिल चाळक, धनंजय राख, जीवन पालवे, अभी डाके, शशिकांत खामकर आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!