Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमऑनलाईन जुगार चालवणार्‍यांना कुमावतांचा दणका, 20 जणांना घेतले ताब्यात; दीड लाखाचा मुद्देमाल...

ऑनलाईन जुगार चालवणार्‍यांना कुमावतांचा दणका, 20 जणांना घेतले ताब्यात; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त


बीड (रिपोर्टर) जुगाराचा अड्डा तयार करून त्यामध्ये कल्याण मटका, मधूर नाईट व मधूर डे चे आकडे मोबाईलवर घेऊन ऑनलाईन जुगार चालवणार्‍या जुगार अड्ड्यावर पंकज कुमावतांनी छापा टाकून 20 जणांना रंगेहात पकडले. या वेळी त्यांच्याकडून नगदी रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, मोबाईल असा दीड लाखाचा ऐवज जप्त केला तर ऑनलाईन जुगार घेणार्‍यांची नावे घेऊन अशा एकूण 114 जुगार्‍यांवर परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान नगर येथील शिवाजी जाधव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती रात्री सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टिमसह जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर तेथे विलास पावडे, सुरेश तरडे, बालासाहेब मुंडे, संतोष साळुंके, राम बदने, प्रल्हाद काळे, प्रेमचंद आव्हाड यांच्यासह अन्य काही जण पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका मधूर डे व मधूर नाईट जुगाराचे आकडे तयार करत असल्याचे त्यांना आढळून आले. या वेळी त्यांनी 20 जुगार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 13 हजार 310 आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. वरील एजंटकडून मोबाईलवर आकडे देणार्‍या इसमांची माहिती घेून त्यांची नावे निष्पन्न करून एजंट बुकी मालक असे एकूण 114 जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पंकज कुमावत, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब शिंदे, पो.हे.कॉ. बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राहमरी हंडणे, विकास चोपडे, राजू वंजारे, युवराज भुंबे यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!