परळी (रिपोर्टर) मराठवाड्यासाठी आ. सतीश चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलेले आहे. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीपासून मराठवाड्यातील पदवीधरांची भावना सतीश चव्हाण यांच्यावर होती. ही निवडणूक एकतर्फी झाली असून आ. चव्हाण हे विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचा विश्वास ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
मराठवाडा पदवीधर निवडणूकीसाठी आज मतदान होत असून सकाळी ना.धनंजय मुंडे यांनी गाडे पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर जावून मतदान केले. यावेळी माध्यमाशी बोलताना ना.मुंडे म्हणाले की, गेल्या बारा वर्षामध्ये आ.सतिष चव्हाण यांनी मराठवाड्यासाठी आणि पदवीधरासाठी मोठे काम केलेले आहे. निवडणूकीच्या प्रचारापासून सतिष चव्हाण यांच्या बाजूने पदवीधरांचा कल होता. पदवीधरांची निवडणूक एकतर्फी झाली. आ.सतिष चव्हाण यांनी प्रचारात सुरूवातीपून ते शेवटपर्यंत आघाडी घेतलेली होती. त्यांचा विक्रमी मताने विजय होणार असल्याचा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.