Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमधक्कादायक - चार मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या

धक्कादायक – चार मुलांसह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या


अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील घटना
गेवराई/अंबड (रिपोर्टर) चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे गुरुवार रोजी रात्री घडली असून सरत्या वर्षाच्या सकाळी शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. दरम्यान आपल्या चार मुलांसह 30 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असून मृतांत एक मुलगा तीन मुलींचा समावेश आहे.

घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर 93 मधील फिसके नामक शेतकर्‍याच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले असून मृता मध्ये गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय 30 वर्ष),भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय 12 वर्ष), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय 10 वर्ष), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय 8 वर्ष), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय 6 वर्ष), असे या मृतांचे नावे आहेत. आज सकाळी 9 वाजता या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत विहीरितून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. दरम्यान या मन हेलावून टाकणार्‍या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Most Popular

error: Content is protected !!