Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडटपर्‍यांवर मटका घेणार्‍या एजन्टसह बुकींवर कारवाई

टपर्‍यांवर मटका घेणार्‍या एजन्टसह बुकींवर कारवाई


बीड (रिपोर्टर)- पान टपर्‍या टाकून त्यामधून सर्रासपणे मटका चालवणार्‍या एजन्टसह बुकी मालकाला पंकज कुमावतांनी बुकी मालकांना दणका दिला असून काल अंबाजोगाई शहरातील विविध पान टपर्‍यांवर धाडी टाकून त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या वेळी १० एजन्टांसह दोन बुकींवर अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरात अनेक पान टपर्‍यांवर सर्रासपणे मटका घेत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावतांना मिळाल्यानंतर त्यांनी आपले पथक पाठवून अंबाजोगाई शहरातील बसस्थानक परिसरामध्ये आर.के. पानसेंटर येथे छापा मारला असता मटका घेणारे चार इसम आढळून आले. त्यामध्ये इरफान उस्मान खान (वय ३७, रा. मिलिंदनगर अंबाजोगाई), रोहीत राजकुमार साठे (वय ३०, रा. सिद्धार्थनगर अंबाजोगाई), मोहसिन युनुस शेख (वय २८, रा. जोगाईवाडी ता. अंबाजोगाई), इनायत मुनीर पठाण (वय २०, रा. मिल्लतनगर अंबाजोगाई) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. तर दुसरी कारवाई आई पान सेंटर व योगेश्वरी पान सेंटर या दोन पान टपर्‍यांवर करण्यात आली. तेथे शिवाजी लक्ष्मण शिंदे (रा. बंकट गल्ली, अंबाजोगाई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. योगेश्वरी पान टपरीवरील कैलास धोंडीराम हुरदुडे व कृष्णा आसाराम मोहाणे यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. ४५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दहा एजंटसह दोन बुकींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भालेराव, दिलीप गिते यांच्यासह आदींनी केली.

Most Popular

error: Content is protected !!