बीड (रिपोर्टर): बसस्थानकात उभ्या असलेल्या एका युवकाच्या पायावरून एसटी बसचे चाक गेल्याने सदरील युवक जखमी झाल्याची घटना आज सकाळी बीड बसस्थानकात घडली.
राधेश्याम आमटे (वय 35,रा. खांडेपारगाव) हे आज सकाळी बीड बसस्थानकात उभे होते. एसटी बस क्र. एम.एच. 15 जे.सी. 4663 च्या चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवल्याने गाडीचे चाक आमटे यांच्या पायावरून गेले. यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना बसस्थानकामध्ये घडल्या आहेत.