Friday, January 28, 2022
No menu items!
Homeकोरोनापंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग, यावेळी ओमायक्रॉन विषाणुची बाधा

पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग, यावेळी ओमायक्रॉन विषाणुची बाधा

बीड -ऑनलाईन रिपोर्टर माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी त्यांना कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची लागण झाल्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे आणि त्यामध्ये म्हटले आहे की, ‘लक्षणे आणि कोरोना दोन्ही आहे.’ सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पंकजा मुंडेंची ट्विट करुन माहिती..
पंकजा मुंडे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्याबरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि कोरोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.

पंकजा मुंडे यांना ओमायक्रोनची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज समोर आला असून त्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पंकजा यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.

राज्यात दिवसभरात 9,170 रुग्ण आढळळे
राज्यात दिवसभरात राज्यात 9 हजार 170 नवीन कोरोनाबाधित आढळल्याचे समोर आले आहे. तर, मुंबईत 6 हजार 347 नव्या कोरोनाबाधितांची आज नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात आज सात कोरोनाबाधित रूग्णांचा तर मुंबईत एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

Most Popular

error: Content is protected !!