Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड


भारत सासणे हे बीडचे तत्कालीन कलेक्टर
लातूर (रिपोर्टर) वर्षभरापासून वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवट वादानेच नाशिक येथे झाला होता. याच संमेलनात ९५ वे संमेलन उदगीर (जि. लातूर) येथे होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केली होती. दरम्यान ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरु होती. दरम्यान, या चर्चांवर पूर्णविराम लागला असून ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. उदगीर येथे महामंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी सर्वांनुमते ही घोषणा करण्यात आली.

भारत सासणे हे वैजापूरला ४ एप्रिल २०१० रोजी झालेल्या ५व्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते. बहिर्जी शिक्षण संस्थेतर्फे वसमत येथे ९ आणि १० नोव्हेंबर २०१४ या काळात आयोजित केलेल्या ३५व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील भारत सासणे यांच्याकडे होते. याशिवाय नाशिकच्या उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचे जळगाव येथे १४ फेब्रुवारी २०१६ रोजी भरलेल्या एक दिवसीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवलं आहे. सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने समग्र साहित्य सेवेबद्दल सूर्योदय पुरस्कारदेऊनही सासणे यांना गौरवण्यात आलं आहे.

भारत सासणे बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी
९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भारत सासणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ते बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आहेत. २००९ साली सासणे यांनी बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. १३-८-२००९ ते ११-०५-२०१० पर्यंत जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणार्‍या सासणे यांची ग्रंथसंपदा अफाट आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!