Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडअज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्ड वापरून खर्च केले सव्वालाख

अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्ड वापरून खर्च केले सव्वालाख


बीड (रिपोर्टर)- अज्ञात व्यक्तीने एकाचे क्रेडिट कार्ड वापरून एकदा १ लाख ३० हजार तर दुसर्‍या वेळेस २ हजार ९९९ रुपयांची खरेदी करून एकाची फसवणूक केल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चांगदेव संदीपान मुंडे (रा. पोखरी रोड, ता. अंबाजोगाई) या शेतकर्‍याचे अज्ञात व्यक्तीने दि. २२ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रेडिट कार्डमधून एकदा १ लाख ३० हजाराची तर दुसर्‍या वेळेस २ हजार ९९ रुपयांची खरेदी करून एकूण १ लाख ३२ हजार ९९९ रुपयांची खरेदी केली. आपली फसवणूक झाल्याचे चांगदेव मुंडे यांच्या लक्षात आल्यानंतर काल त्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!