Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यात सोमवारी कोरोना शुन्यावर

जिल्ह्यात सोमवारी कोरोना शुन्यावर


बीड (रिपोर्टर) कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा संभाव्य धोका ओळखून प्रशासन सतर्क झालं आहे. ऑक्सिजन, बेड, डॉक्टरांची जमजमवी वेगात सुरू असताना बीडचा कोरोना मात्र शुन्यावर गेला आहे. सोमवारी आरोग्य विभागाला ५२३ संशयितांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामधील सर्वच्या सर्वच ५२३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. रोज १० च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या बीड जिल्ह्यात ४२ ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आज आलेल्या अहवालात एकही संशयित कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. मात्र प्रशासनाच्या आणि मिडियाच्या वतीने कोरोनाची भीती मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे मात्र भीती बाळगू नये, आतापर्यंत बीड जिल्ह्यात १ लाख ३ हजार ७१८ जण कोरोना पॉझिटिव्ह झालेले होते त्यापैकी १ लाख ८३६ जणांनी कोरोनावर यास्वी मात केली.

Most Popular

error: Content is protected !!