Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीड५५ दिव्यांगांनी सर केले कळसुबाईचे शिखर बीडच्या डॉ. बारकुल यांचा सहभाग

५५ दिव्यांगांनी सर केले कळसुबाईचे शिखर बीडच्या डॉ. बारकुल यांचा सहभाग


बीड (रिपोर्टर) महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वोच्च कळसुबाई शिखरावर राज्यातील ५५ दिव्यांगांनी नवीन वर्ष साजरं करत शिखरावर तिरंगा झेंडा फडकवला. यामध्ये बीड येथील डॉ. बारकुल आणि कचरू चांभारे या दोघांचा सहभाग होता.

राज्यातील सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र येऊन शिवूर्जा प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी कळसुबाई शिखरावर नवीन वर्ष साजरा केला जातो. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गाडे यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी राज्यभरातील ५५ दिव्यांगांनी कळसुबाईचे शिखर पार केले. यामध्ये बीड येथील डॉ. अनिल बारकुल, कचरू चांभारे यांचा सहभाग होता.

Most Popular

error: Content is protected !!