Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडउमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख, दुपारपर्यंत केजमध्ये ४० तर वडवणी...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख, दुपारपर्यंत केजमध्ये ४० तर वडवणी ३९ अर्ज दाखल


बीड (रिपोर्टर) ओबीसी आरक्षणाचा निर्णय लागू शकला नसल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले असल्याने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत केजमध्ये ४० तर वडवणीमध्ये ३९ अर्ज दाखल झाले होते.

नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चचेर्त आला होता. ओबीसींच्या जागेबाबत निर्णय होऊ शकला नसल्यामुळे निवडणुक आयोगाने या जागेसाठी निवडणूक घेण्याचे आदेश दिले. या जागा सर्वसाधारणमधून लढवल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने केजमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत चाळीस जणांचे अर्ज दाखल झाले होते. केज शहरातील वॉर्ड क्र. १, २, ८ आणि १२ साठी मतदान होणार आहे तर वडवणीमध्ये ३९ अर्ज दाखल झाले होते. याठिकाणी वॉर्ड क्र. ४, ५, ६ आणि १३ साठी मतदान होणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!