Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीड१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, जिल्ह्यात ५० ठिकाणी लसीकरण केंद्र

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, जिल्ह्यात ५० ठिकाणी लसीकरण केंद्र


आ.क्षीरसागर, जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ,

रुग्णवाढीच्या अनुषंगाने बीडचे प्रशासन सतर्क


बीड (रिपोर्टर) राज्यातला वाढता कोरोना आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रभाव पाहता बीड जिल्हा प्रशासन अधिक सतर्क होत आज १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयात करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रुग्णालयाची पाहणी केली. जिल्ह्यात ५० केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात दुपारपर्यंत १४० मुलांनी नाव नोंदणी केली होती.


गेल्या अनेक दिवसांपासून वयाने १८ पेक्षा कमी असलेल्या मुलांना लसीकरण करण्याबाबत केंद्र आणि राज्य प्रयत्नशील होते, मुलांना लसीकरण द्यायचे की नाही, केव्हा द्यायचे, याबाबत डब्ल्यूएचओसह टास्क फोर्ससोबत वेळोवेळी चर्चा करण्यात आल्यानंतर या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची घोषणा करण्यात आली. मात्र त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी होत नव्हती. गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनासह ओमिक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून येऊ लागल्यानंतर लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने कात टाकली. गेल्या तीन दिवसात प्रतिदिन नऊ ते बारा हजार रुग्णांची वाढ होत असताना रुग्णवाढीचा दर १८३ टक्क्यांवर जावून पोहचल्यानंतर १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्हा प्रशासनाने या निर्णयाची आज तात्काळ अमलबजावणी करण्यास सुरुवात करून जिल्ह्यात तब्बल ५० केंद्र मुलांच्या लसीकरणासाठी उभारले. आज (सकाळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, डॉ. ढाकणे, डॉ. आंधळकर, डॉ. शिंदे, मेट्रॉन रमा गिरी यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ केला. १४० मुलांनी लसीकरणासाठी आज नावनोदंणी केल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा रुग्णालयात पाहणी करताना ऑक्सिजन प्लान्टला भेट दिली. रुग्णालयातील स्वच्छता यासह अन्य आरोग्य सेवेबाबत उपस्थित अधिकार्‍यांना सूचना केल्या.

दुपारी दोन वाजता जिल्हाधिकार्‍यांची आरोग्य विभागासोबत महत्वपुर्ण बैठक
बीड जिल्ह्यात सध्यातरी एक हजार कोव्हीडच्या तपासणीमध्ये पाच ते सहा रुग्ण आजच्या तारखेत निघत असले तरी राज्यातील कोवीडची वाढणारी रुग्ण संख्या ओमीक्रॉनचा वाढलेला धोका या बाबत आढावा घेवून उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुक्याचे सर्व आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक होणार असून या बैठकीनंतर जिल्हा प्रशासनाच्यावतीने काही कठोर निबर्ंंध लागण्याची शक्यता आहे.

Most Popular

error: Content is protected !!