Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशेतकर्‍यांना पिकविमा द्या, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने

शेतकर्‍यांना पिकविमा द्या, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने


बीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. शेतकर्‍यांना नुकसान होवूनही विम्याचा लाभ मिळाला नाही. विमा कंपनीने तात्काळ विमा द्यावा या मागणीसाठी आज काही शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस पडला होता. या पावसात खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पिकविमा भरला होता. नुकसान होवूनही शेतकर्‍यांना पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. शेतकडो शेतकरी विम्यापासून वंचित राहिले असून विमा कंपनीने सर्व शेतकर्‍यांना विम्याची घोषणा करावी या मागणीसाठी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकर्‍यांनी तीव्र निदर्शने करून विमा कंपनीचा निषेध केला. यावेळी धनंजय गुंदेकरसह आदि शेतकरी उपस्थित होते. शेतकर्‍यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.

Most Popular

error: Content is protected !!