Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडना. धनंजय मुंडे जिल्ह्यात डेरेदाखल लॅब टेस्टींगच्या उद्घाटनासाठी जिल्हा रुग्णालय सजले

ना. धनंजय मुंडे जिल्ह्यात डेरेदाखल लॅब टेस्टींगच्या उद्घाटनासाठी जिल्हा रुग्णालय सजले


बीड (रिपोर्टर)- बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत आरटीपीसीआर टेस्टींग लॅब अखेर आजपासून जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू होत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून जिल्हा रुग्णालयामध्ये आरटीपीसीआर टेस्यींग लॅब व्हावी यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते. ना. मुंडेंनी याआधी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार आज ना. मुंडेंच्या हस्ते लॅब टेस्टींगचे उद्घाटन होत आहे. मराठवाड्यात सर्वात मोठी आरटीपीसीआर टेस्टींग लॅब ही जिल्हा रुग्णालयात असणार आहे.


राज्यामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून जिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ आरटीपीसीआर टेस्टींग लॅब सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला. आतापर्यंत कोरोनाची टेस्ट अंबाजोगाई या ठिकाणी होत होती, आता कोरोनाची टेस्ट जिल्हा रुग्णालयात होणार असून या लॅब टेस्टींगची क्षमता ५ हजारापर्यंत आहे. दररोज पाच हजार रुग्णांची टेस्ट येथे होऊ शकते. या लॅबचे उद्घाटन आज दुपारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून या उद्घाटन समारंभाला आ. संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह आदींची उपस्थिती राहणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!