Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडगुणवत्तेसाठी कर्तृत्व रस्त्यावर उतरलं

गुणवत्तेसाठी कर्तृत्व रस्त्यावर उतरलं


आ. संदीप क्षीरसागरांनी बायपास टू बायपास रस्ते कामाची केली पाहणी दर्जेदार रस्त्यासाठी मी कटिबद्ध -आ. संदीप क्षीरसागर
बीड (रिपोर्टर) बीड शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम अत्यंत गुणवत्तापुर्ण करून घेण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर हे रस्त्यावर उतरले. जिथे काम सुरू आहे तिथे जातीने जात कामाची पाहणी करत शासनाच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार दर्जेदार रस्ता करून घेण्यास मी कटिबद्ध असल्याचे सांगत या रस्त्याच्या कामावर माझे पुर्ण लक्ष आहे. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्‍वास देत आ. संदीप क्षीरसागरांनी बायपास टू बायपास हा रस्ता अत्यंत दर्जेदार लवकरच पुर्ण होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि वाहन धारकांना मोठा आधार मिळेल. आ. क्षीरसागरांच्या या काम करण्याच्या पद्धतीचे शहरातील जनतेने कौतुक केले आहे.

बीड शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी स्वतः जातीने लक्ष घातले असुन रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी स्वतः उभा राहून कामाची त्यांनी पाहणी केली. शासनाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकानुसार दर्जेदार रस्ता होणार यासाठी मी कटिबद्ध आहे. रस्त्याच्या कामावर माझे लक्ष आहे, हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वासही आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. बीड शहरातील बायपास टू बायपास रस्ता काम आ. संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे शहरातील नागरीक आणि वाहन धारक यांना मोठा आधार मिळेल.
बीड शहरातील बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खा. शरदचंद्रजी पवार, खा. सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आ.संदिप क्षीरसागर यांनी भेट घेवून सदर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे कामास सुरूवात होत नव्हती.तांत्रिक अडचणी दुर झाल्याने प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आली आहे. बीड शहरातून सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग (५२) जातो. या रस्त्याला बीड शहरामध्ये बाह्यवळण झाल्यानंतर बीड शहरातील अंतर्गत बायपास टु बायपास रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांनाही चालणे कठीण झाले होते. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून सदर रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. या रस्ता कामाची आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हा रस्ता जिरेवाडी महालक्ष्मी चौक-जालना रोड-छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा-बार्शी रोड-बार्शी नाका ते कोल्हारवाडी बायपासपर्यंत होत आहे. या रस्ता कामाला सुरूवात झाल्याने रस्ता काम पुर्ण झाल्यानंतर शहरातील वाहनधारकांना तसेच नागरिकांना मोठा आधार मिळेल.

Most Popular

error: Content is protected !!